अल्लीपूर,
dhanraj supare येथील तंटामुती समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. ग्रामसभेला ग्राम विस्तार अधिकारी यांच्या अनुपस्थितीमध्ये हिंगणघाट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चांभारे व तुषार जोगी यांनी सभेची जबाबदारी पार पाडली. तंटामुती अध्यक्ष पदासाठी माणिक कलोडे, धनराज सुपारी व कारवटकर यांनी अर्ज केले होते. कारवटकर यांनी माघार घेतल्याने दोनच अर्ज शिल्लक राहिले.
त्यातही सरपंचांनी सर्वानुमताने निवड करण्यावर भर दिल्याने ग्रामसभेत नागरिकांनी मतदान घेण्याचे सुचविले. त्यावरून ग्रामसभेला उपस्थित ३९९ पैकी ३३७ नागरिकांनी मतदान केले. धनराज सुपारे यांना १७९ तर माणिक कलोडे यांना १५८ मते मिळाली. यात धनराज सुपारे निवडून आले. धनराज सुपारे यांना दुसर्यांदा तंटामुती अध्यक्षांचा मान मिळाला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती विस्तार अधिकारी चांभारे, तुषार जोगी, कृषी सहाय्यक चितोडे व कर्मचार्यांनी मतदान प्रक्रिया पूर्ण केली. विजय उमेदवाराचे गुलाल उधळून शुभेच्छा दिल्या.