मंगरूळनाथ,
harish biyani येथील श्री दामोदर जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष हरीश बियाणी यांनी जिनिंग व प्रेसिंग (कापूस प्रक्रिया) उद्योगात केलेल्या उत्कृष्ट कार्याची, उच्च दर्जाच्या रुईच्या उत्पादनाची तसेच रुई निर्यात क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘उत्कृष्ट कृषी उद्योजक’ पुरस्काराने माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले सन्मानित करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष भाई देवराव फुके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय देशमुख, जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष सतीश बाहेती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओम बंग यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.