संघ कार्यालयातून राष्ट्र व सेवा कार्याचा भाव निर्माण होतो ः पश्चिमक्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया

रा. स्व. संघाच्या सुदर्शन भवन व अभ्यासिका लोकार्पण सोहळा

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
बुलढाणा
rss-sudarshan-bhavan संघ कार्यालयात संघ कार्याचा राष्ट्रभाव निर्माण होतो जीथे संघाचा भाव तिथे समाजकार्याच्या शिक्षणासाठी पुस्तकांची ÷अभ्यासिका ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही असे विद्यार्थी घडविण्याचे काम त्यांचे प्रतिबंब जेव्हा समाजात उमटते तेव्हा ज्ञान देण्याचे कार्याशिवाय जुन्या नव्या कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण कार्यालयात होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत जुन्या स्वंयसेवकांनी घरावर तुळशी पत्र ठेवून प्रसंगी कारागृहात शिक्षा भोगली त्यांचे परिश्रमाची आठवण नविन पिढीला झाली पाहिजे. त्याग, तपश्चर्या, दृढ निश्चयाने मार्गक्रमण करून आज चांगल्या दिवसाची समृद्धी दिसत आहे. राष्ट्र कार्यात समाजाचा सहभाग वाढवुन सेवा कार्य संघ कार्यालयातून होते असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया यांनी केले.
 
sudarshan
 
जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठान चिखली द्वारा रा. स्व. संघ बुलढाणा संघ कार्यालय सुदर्शन भवन एकता नगर आणि डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती अकोला द्वारा सुदर्शन अभ्यासिका लोकार्पण सोहळा दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आले. भ्रातृ मंडळ शिवशंकर नगर बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर रा. स्व. संघ विदर्भ प्रांत संघचालक दिपक तामशेट्टीवार, विभाग संघचालक चित्तरंजन राठी, नगर संघचालक महेश पेंडके, जिजामाता राष्ट्रीय संस्कार प्रतिष्ठान चिखली अध्यक्ष अरविंद आसोलकर, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी समिती अकोला अध्यक्ष चंद्रशेखर राठी उपस्थित होते.
 
प्रारंभी भारतमाता पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अभ्यासिका उदघाटनासाठी आलेले प्रशासनातील अधिकारी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, निवासी उपपोलिसअधिक्षक पावरा यांनी ÷अभ्यासकेला पुस्तके भेट दिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. वैयक्तीक गीत अलोक शेवडे यांनी सादर केले. मान्यवरांच्या हस्ते लोकापर्ण सोहळा आभासी पद्धतीने करण्यात आला.
 
रा. स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, संघ कार्यात किती मानधन मिळते असे समाजात विचारल्या जाते परंतु एक व्यक्ती जेव्हा कार्यालया समोरून जात होता तेव्हा कार्यालयाची घड्याळ दुरुस्तीसाठी आला हळूहळू त्याने आपल्या व्यस्त कार्यातून संघकार्यालयाला वेळ देवू लागला आणि संघाशी जोडल्या गेला, संघाचा भाव राष्ट्रभाव जिथे जातो तिथे स्वंयसेवक तयार होतो. समाजाचे प्रतिबिंब शिक्षणासाठी सुदर्शन अभ्यासिकाला अधिकार्‍यांनी पुस्तके भेट दिली. समाजाच्या सहभागातून शिस्त लावण्यासाठी स्वच्छता अभियान करू शकतो. संघाचा स्वंयसेवक म्हणून काय साध्य केले असे आपण एकतो तेव्हा संघकार्यालयातून समाज परिवर्तन संस्कारित सज्जन शक्ती तयार करण्याचे कार्य अविरत झाले पाहिजे असे त्यांनी आर्वजून सांगितले. लोकापर्ण सोहळ्याचे प्रास्ताविक परिचय बुलढाणा नगर सहकार्यवाह विवेक उबरहंडे तसेच आभार नगरसंघचालक महेश पेंडके यांनी मानले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक, राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.