इंडिगोच्या विमानात ‘बॉम्बची चिठ्ठी

बेंगळुरूत उतरल्यानंतर विमानाची कसून तपासणी

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
उत्तर प्रदेश
indigo flight bomb threat उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊहून बेंगळुरूकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी देणारी चिठ्ठी आढळल्याने खळबळ उडाली. इंडिगोच्या 6E321 या विमानात टिश्यू पेपरवर ‘BOMB’ असे लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. विमानाच्या मागील भागात ही चिठ्ठी सापडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने तपासणी सुरू केली. मात्र, विमान बेंगळुरू विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आणि तपासणीनंतर ही धमकी अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
 

indigo flight bomb threat note marked bomb found on lucknow-bengaluru flight 
एअरलाइनकडून मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊहून बेंगळुरूकडे जाणारे इंडिगोचे 6E321 विमान सकाळी सुमारे ९.४० वाजता बेंगळुरू विमानतळावर सुरक्षित उतरले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पडल्यानंतर नियमित साफसफाई सुरू असताना कर्मचाऱ्यांना एक टिश्यू पेपर आढळला. त्यावर ‘BOMB’ असा शब्द लिहिलेला होता. त्यानंतर विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना याची माहिती देण्यात आली.
सुरक्षा प्रोटोकॉलनुसार बेंगळुरू विमानतळावरील पथक तसेच संबंधित सुरक्षा यंत्रणांनी विमानाची सखोल तपासणी केली. विमानातील प्रत्येक भागाची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर धमकी देणारी चिठ्ठी बनावट असल्याचे स्पष्ट झाले. विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सामग्री आढळून आली नाही.
दरम्यान, ही संपूर्ण घटना बेंगळुरू विमानतळावर घडली असून, तिचा लखनऊ विमानतळाच्या संचालनाशी किंवा तेथील सुरक्षा व्यवस्थेशी कोणताही संबंध नसल्याचे इंडिगोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी जुलै महिन्यातही इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी देणारी चिठ्ठी आढळली होती. बेंगळुरूहून अहमदाबादला जाण्यासाठी सज्ज असलेल्या इंडिगोच्या विमानाच्या वॉशरूममध्ये धमकीची चिठ्ठी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्या चिठ्ठीवर विमानात बॉम्ब असल्याचे लिहिले होते. घटनेनंतर अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नव्हती. या प्रकरणी इंडिगोने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. या घटनेमुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला होता.