पं. राजाभाऊ कोगजे शताब्दीपूर्तीनिमित्त संगीत समारोह

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
नागपूर,
music festival भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नामवंत ज्येष्ठ कलाकार स्व. पं. राजाभाऊ कोगजे यांच्या शताब्दीपूर्तीनिमित्त चिटणवीस सेंटर, सप्तक आणि मैफिल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारोह आज आणि उद्या चिटणवीस सेंटर, नागपूर येथे होणार आहे.
 
music festival
 
समारोहाचा प्रारंभ आज सायंकाळी ६ वाजता आकाशवाणी केंद्र, नागपूरचे माजी निदेशक दिगंबर पिंपळघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. साधना शिलेदार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यांना नुकताच प्राप्त झालेल्या ‘पं. विष्णु दिगंबर पलुस्कर संगीतरत्न पुरस्कार २०२६’बद्दल हा सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर पं. राजेंद्र भावे, मुंबई यांचे व्हायोलिन वादन तसेच बनारस घराण्याचे गायक राहुल मिश्रा आणि रोहित मिश्रा यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे.
 
समारोहाच्या दुसऱ्या दिवशी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता प्रो. सुजाता व्यास आणि पं. अनिरुद्ध देशपांडे यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यानंतर स्व. पं. राजाभाऊ कोगजे यांच्या प्रत्यक्ष मैफिलीचे पुनर्प्रसारण करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय संगीत समारोहात तबला संगत वेद ढोक आणि निलेश खोडे, तर हार्मोनियम संगत संदीप गुरमुले आणि श्रीकांत पिसे करणार आहेत.
सौजन्य: योगिता चाकोले, संपर्क मित्र