लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने घेतले विष प्राशन

इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून प्रेमसंबंध; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur crime प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे एका २७ वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत सोमवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून सीताबर्डी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
 

nagpur crime marriage refusal leads to poisoning attempt; instagram friendship turns into relationship 
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरोपी प्रज्ज्वलेश माटे (२६, रा. खापा) याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमसंबंधात झाले. आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन देत तरुणीशी जवळीक वाढविली. ८ सप्टेंबर २०२५ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोपी तिला रामदासपेठ येथील एका हॉटेलमध्ये घेऊन जात होता. तेथे त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
प्रेमसंबंधात फसवणूक झाल्याने होती निराश
 
 
काही काळानंतर तरुणीने आरोपीकडे लग्नाची nagpur crime मागणी केली. मात्र, त्याने लग्नास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. प्रेमसंबंधात फसवणूक झाल्याच्या भावनेतून निराश झालेल्या तरुणीने सोमवारी विष प्राशन केले. तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसल्यानंतर कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने तिला वाडी परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिसांनी तरुणीविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याच्या आरोपावरून सीताबर्डी पोलिसांनी प्रज्ज्वलेश माटे याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.