गर्दे वाचनालय सामाजिक उपक्रमास प्रांत संघचालक तामशेट्टीवार यांची सदिच्छा भेट, संवाद

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
बुलढाणा
prant-sanghchalak-tamshettivar-visitsयेथील गर्दे वाचनालयात भेटीचा योग आला वाचन संस्कृती लयास जात आहे. अशी ओरड सर्वत्र दिसत असतांना हे वाचनालय आजही दिमाखात ती संस्कृती जपत आहे. आजवरची प्रगती कौतुकास्पद व प्रशंसानिय आहे. वाचकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. हे विशेष या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत राहो सर्व संचालक हे वाचनालय प्रगती पथावर रहावे यासाठी प्रयत्नशील आहेत असा अभिप्राय प्रांत संघचालक दिपक तामशेट्टीवर यांनी वाचनालयास सदिच्छा भेट व संवादातून दिली आहे.
 
buldhana
दि. २६ ऑगस्ट रोजी गर्दे वाचनालयाच्या सामाजिक शैक्षणिक उपक्रमला सदिच्छा भेट देवून उपस्थित संचालकांशी विविध विषयांवर संवाद त्यांनी साधला याप्रसंगी वाचनालयाच्या वतीने त्याचा संत गजानन महाराजांची प्रतिमा, पुस्तक भेट तसेच शाल, गुच्छ देवून सन्मान सत्कार करण्यात आला.
 
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ शर्मा, सचिव उदय देशपांडे, संचालक सदस्य विश्वभर वाघमारे, बाबा वरणगावकर, संजय कुळकर्णी, रविंद्र जाधव, आशुतोष वाईकर, संजय काळे, सुधीर काळे नगरसंघचालक महेश पेंडके, माजी नगरसेवक अरविंद होडे, दत्ता पाटील, ग्रंथपाल नेमिनाथ सातपूते, भारत काटकर, डॉ. सुभाष जोशी, डॉ. पिंपरकर, पत्रकार नितीन शिरसाट उपस्थित होते.