सिंदी (रेल्वे),
provide sugar श्रावण मासासोबतच सणासुदींची वर्दळ असते. याच काळात साखरेचे दर गगनाला भिडले. परिणामी, सरकारने आयातीत साखर रेशनच्या दुकानातून वितरित करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केशरी कार्डधारकांनी केली आहे. मागील दोन आठवड्यांपासून बाजारात साखरेचे दर ८० ते ८२ रुपये किलो झाले. गुळाने देखील पंच्याहत्तरी गाठली आहे.
नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि पोळा त्यानंतर गणेशोत्सव आदी सणांच्या चाहूल लागताच व्यापारी व साठेबाजांनी साखरेचे दर वाढवले. येत्या आठवड्यात केंद्र सरकारने १० लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने त्या आयातीत साखरेपैकी गरजेपुरता साठा रेशन दुकानांच्या माध्यमातून जनतेला वितरित करावा. सेलू तालुयातील दीड लाख कार्डांच्या माध्यमातून साखर वितरित झाल्यास गोरगरिबांना सण-उत्सव साजरा करण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही व्यत केली जात आहे.