देश, समाज, देव व स्वत:ला समजण्यासाठी वाचन आवश्यक

डॉ. मनमोहन वैद्य यांचे प्रतिपादन

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
हिंगणघाट
mg-vaidya-trust सर्वं समाजाचा विचार करणे हे मनुष्याचे काम आहे. छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून चरित्रवान पिढी घडविण्यासाठी मा. गो. वैद्य न्यासाच्या वतीने विद्याथ्र्यांसाठी वाचन स्पर्धा आयोजित करण्यात येते. यातून समाज घडविण्याचा प्रयत्न होत आहे. वाचन स्पर्धेच्या माध्यमातून वाचनाची आवड निर्माण होते. देश, समाज, देव व स्वत:ला समजण्यासाठी वाचन आवश्यक आहे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य डॉ मनमोहन वैद्य यांनी केले.

vaidya
तरोडा येथील केजाजी सेलिब्रेशन सभागृह येथे २६ रोजी मा. गो. वैद्य न्यास तर्फे आयोजित वाचन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार होते. व्यासपीठावर न्यासचे अध्यक्ष अरविंद कुकडे, सचिव दत्ता टेकाडे, सहसचिव डॉ. दिलीप चौधरी उपस्थित होते.
डॉ. मनमोहन वैद्य यांनी वाचाल तर वाचाल या जुन्या म्हणीचा संदर्भ देत आपली संस्कृती, सभ्यता टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला छोट्या मुलांना ऐतिहासिक, महापुरुषांच्या व सामाजिक आशय असलेलेली पुस्तकं वाचायला द्या तरच नवीन पिढीला देश, समाज, देव कळून मी ऐवजी आम्हीची जाणीव होईल असे ते म्हणाले.
आमदार समीर कुणावार यांनी शिक्षण, नैसर्गिक शेती याबाबत मा. गो. वैद्य न्यास करीत असलेले कार्य अभिनंदनिय असल्याचे सांगुन समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे बिघडत चाललेली नवीन पिढीच्या हातात पुस्तक देऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा हा उपक्रम समाजाला योग्य संदेश देणारा आहे. संघ स्वयंसेवक म्हणून न्यासाच्या वतीने आपल्याला जी जबाबदारी देईल त्याचे आपण पालन करू असे आश्वासन त्यांनी दिले.
या वाचन स्पर्धेत हिंगणघाट व वर्धा तालुक्यातील विविध शाळातील १४५० विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. ध्रुव, प्रल्हाद व अभिमन्यू अशा तीन गटात घेण्यात आलेल्या वाचन स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. मनमोहन वैद्य, आ. कुणावार यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
संचालन विनेश काकडे यांनी केले. प्रास्ताविक अरविद कुकडे यांनी केले. आभार दिलीप चौधरी यांनी मानले. यावेळी पालकांच्या वतीने साक्षी कडू यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला विदर्भ धर्मजागरण प्रमुख अनंत बुजोने, न्यासचे उपाध्यक्ष हरिभाऊ वझुरकर, प्रोग्रेसिव्हचे सचिव रमेश धारकर, रमेश टपाले, भूपेंद्र शहाणे, धनंजय वैद्य, शशिभूषण वैद्य, मिलिंद वैद्य, जिपचे माजी सदस्य देवराव पाटील, पुंडलिक लांडगे आदी उपस्थित होते.