कारखेडची सून रोशन सोळंके यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती

महसूल प्रशासनातील उल्लेखनीय कार्याचा गौरव

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
कारंजा लाड,
roshan solanke daughter in law वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेड येथील मूळ निवासी तथा कारंजा येथील सेवानिवृत्त प्राध्यापक बाबुराव सोळंके (कारखेडकर) यांची सून रोशन रितेश सोळंके (मकवाने) यांची नुकतीच उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून नुकतीच तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पदोन्नतीची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात त्यांच्या नावाचा समावेश आहे.
 
 
roshan solanke daughter in law
 
मूळच्या मनमाड येथील असलेल्या रोशन सोळंके यांनी शासकीय सेवेची सुरुवात मुख्याधिकारी पदापासून केली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी तहसीलदार पदाची जबाबदारी स्वीकारली. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत सहायक आयुक्त म्हणूनही उत्कृष्ट सेवा बजावली आहे.गेल्या दहा वर्षांपासून त्या नागपूर महसूल विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. या कार्यकाळात सिंदेवाही, वरोरा, कळमेश्वर आणि सध्या नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार (महसूल) म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
 
 
आपल्या शिस्तप्रिय, पारदर्शक आणि कर्तव्यदक्ष कार्यपद्धतीमुळे त्यांनी महसूल प्रशासनात आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आणि उपजिल्हाधिकारीपदी झालेल्या निवडीबद्दल सोळंके परिवार, नातेवाईक, महसूल प्रशासनातील सहकारी व मित्रपरिवाराकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, भावी प्रशासकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.