समृध्दी महामार्गावर अपघात

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
पुलगाव,
accident on the samruddhi mahamarg समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉर चॅनेल क्रमांक ८२.२०० विरुळ जवळ टेम्पो चालकाने समोर चालणार्या अज्ञात वाहनाला मागून धडक दिली. या अपघातात चंदन यादव (३०) रा. वसई, फैजान अहमद (४०) रा. आजमगड उत्तरप्रदेश जखमी झाले. ही घटना आज गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चालक चंदन यादव सहकारी फैजान अहमद यांच्यासह नागपूर येथुन एम.एच. ४८ डीक्यू १९४९ क्रमांकाचा टेम्पो घेऊन मुंबईकडे जात होता.
 
 
accident on the samruddhi mahamarg
 
समृद्धी महामार्गावर विरूळ जवळ चंदन यादव याच्या वाहनाने समोर चालणार्या अज्ञात वाहनास धडक दिली. यात ते दोघेही जखमी झाले. सीआरओ संभाजीनगर यांच्याकडून फोनव्दारे अपघाताची माहिती मिळताच पुलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश चौधरी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी दोन्ही जखमींना महामार्गाच्या रुग्णवाहिकेने येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.