भाजपाकडून मृत व जमखी अर्भकांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

देवदूत ठरलेल्या परिचारीका व परिचरचा सन्मान

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
अमरावती,
amravati hospital fire जिल्हा स्त्री रुग्णालयातील भीषण अग्निकांडात मृत पावलेल्या बाळांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लक्ष रुपये तर जखमी झालेल्या बाळांना योग्य उपचारासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत आज अमरावती भाजपाच्या वतीने करण्यात आली. आग लागली असताना इतर बाळांना वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या तीन परिचारिका आणि एक परिचर यांनाही प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
 

amravati hospital fire bjp provides financial aid to victims’ families and injured babies 
ज्या बाळांनी जीव गमावला त्यांचे जीव आपण परत आणू शकत नसलो तरी सांत्वन म्हणून त्यांच्या कुटुंबियांना फुल नव्हे फुलांची पाकळी म्हणून आर्थिक मदत त्यांच्या गावी जाऊन भाजपाच्या वतीने देण्यात येणार आहे. आज सांत्वन भेटी प्रसंगी खा. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, आ. प्रवीण तायडे, महापौर श्रींचद तेजवानी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जयंत डेहणकर, तुषार भारतीय, निवेदिता दिघडे, नितीन गुडधे, चेतन पवार, आरती राजेश वानखडे, छाया दंडाळे, नगरसेविका लविना हर्षे व लता देशमुख, नगरसेवक मिलिंद बांबल व विनोद तानवैस, दीपक पोहेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजपाने सबानाज असिफ शाह, अश्विनी धुर्वे, सुमरती वाडीवे, मिसबा तबसूम अहमद हुसेन, साजिया तबसूम, तसवर जहा तसलीम खान यांच्या गंभीर झालेल्या बाळांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात आली. भाजपाच्या शिष्टमंडळाने डॉ. हेमंत मुरके, होप आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन रुग्णांच्या आप्तांचे सांत्वन केले. आग लागली असताना इतर बाळांना वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या कीर्ती गणवीर, ललिता कासदेकर, सुरेखा धनविजय या तीन परिचारिका आणि परिचर आकाश चव्हाण यांनाही प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत भाजपाने केली. भाजपाने दहीहंडी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, हे विशेष!