बा. दे.च्या शिक्षकेत्तर कर्मचार्यांची पालकमंत्र्यांना साकडे

अभियांत्रिकीत ६७ महिन्यांचे वेतन थकले

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
वर्धा,
guardian minister सेवाग्राम येथील बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर व सेवानिवृत्त कर्मचार्यांचे तब्बल ६७ महिन्यांचे थकित वेतन आणि त्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी करीत कर्मचार्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे आपली व्यथा मांडली.
 
 
guardian minister
 
१३ ऑगस्टपासून संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख यांच्या निवासस्थानासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला १५ दिवस झाले. तब्बल ६७ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचार्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून घर विकण्याची वेळ आली आहे. मुलांचे शिक्षण थांबविण्याची वेळ आणि कुटुंबातील आजारी व्यक्तींच्या औषधोपचारासाठीही पैसे नसल्याची हृदयद्रावक परिस्थिती कर्मचार्यांनी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या पुढे मांडली.
  
सन २०२३ मध्ये तब्बल १० महिने असहकार सत्याग्रह केल्यानंतर व्यवस्थापनाने नियमित किमान ६० टक्के वेतन देण्याचे लिखीत आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनाची पूर्तता न झाल्याने थकित वेतनाचा आकडा आता ६७ महिन्यांवर पोहोचला आहे. कर्मचार्यांची व्यथा ऐकल्यानंतर पालकमंत्री डॉ. भोयर यांनी तंत्रशिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच, जिल्हाधिकार्यांनीही व्यवस्थापनासोबत चर्चा करून या प्रश्नावर मार्ग काढण्याची माहिती दिली.
मुंडन केले पण फायदा नाही...
बापुरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील ११२ प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मर्यांचे वेतन रखडले आहे. किमान १ महिन्याचे तरी वेतन देण्यात यावे यामागणी साठी शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी १५ विदसांपासुन अध्यक्ष देशमु़ख यांच्या निवासस्थानापुढे आंदोलन सुरू केले. मुंडनही केले. पण, संस्था चालकांना घाम फुटला नाही, हे उल्लेखनिय!