पत्नीच्या विरहात अखेर पतीचाही मृत्यू

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
पोंभुर्णा,
chandrapur सात महिन्यांपूर्वी पत्नीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. पत्नीचा विरह सहन न झाल्याने अखेर पतीनेही प्राण सोडल्याची घटना बुधवारी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात घडली. त्यांच्या मृत्यूने दोन चिमुकली मुले मात्र पोरकी झाली आहे. येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सुनील जनार्दन वनकर (35) हे पत्नी सुफल, 10 वर्षीय मुलगी व 8 वर्षीय मुलासह राहत होते. सात महिन्यापूर्वी त्यांची पत्नीह अंगणात भांडे धुत असताना जीवंत विद्युत प्रवाह असलेल्या टिनाच्या कँपाउंडला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला.
 
 
chandrapur
 
पत्नीच्या मृत्यूनंतर सुनील हे सतत चिंताग्रस्त राहत होते. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत केली. प्रकृती अधीकच गंभीर झाल्याने त्यांना चार दिवसापूर्वी चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. उपचारादरम्यान बुधवारी त्यांचाही मृत्यू झाला. पोंभुर्णा येथील स्मशानभूमीत सुनील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूमूळे दोन चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलाचे छत्र हरपले आहे.