ई रिक्षा चार्जींग करताना मायलेकाला विजेचा धक्का

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
E-Rickshaw Charging ई रिक्षाला चार्जींग करताना प्लगच्या वायरचा ई रिक्षा चालक व त्याच्या आईला जबर धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत ई रिक्षाचालक मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर चालकाची आई या घटनेत सुदैवाने वाचली. ही घटना बुधवारी कळमन्यातील गुलशनगरात घडली. हेमचंद बाबुलाल आमाडार (वय ३३, गुलशननगर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.
 

E-Rickshaw Charging Accident in Nagpur: Driver Dies After Electric Shock 
हेमचंद आमाडार हे गेल्या काही वर्षांपासून ई रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता ते ई रिक्षाला चार्जींगवर लावत होते. यादरम्यान ई रिक्षाचा प्लगचा वायरचा धक्का बसल्यामुळे हेमचंद बेशुद्ध झाले. मुलाला वाचविण्यासाठी त्यांच्या आईने धाव घेतली. आईलाही विजेचा धक्का बसला. दरम्यान, मोठ्या भावाच्या प्रकार लक्षात आला. त्याने ताबडतोब प्लगचे बटन बंद केले. तोपर्यंत भावाचा मृत्यू झाला होता तर तत्परता दाखवल्याने आईचा जीव वाचला. या प्रकरणी कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.