राखी तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
नागपूर,
rakhi making workshop राष्ट्रीय वाचनालय महाल, लक्ष्मीनगर केंद्राच्या वतीने पाच वर्षांवरील मुलांसाठी राखी तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षिका भावना साळकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत मुला-मुलींना विविध प्रकारच्या राख्या तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेला मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेची सुरुवात कुमुदिनी कढव यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी त्यांनी मुलांना राखी तसेच चातुर्मासातील विविध उत्सवांशी संबंधित कथा सांगितल्या. लक्ष्मीनगर केंद्र सांस्कृतिक कार्यकारिणीच्या अध्यक्षा डॉ. नेहा फिरके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

rakhi making workshop
 
कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन केंद्रप्रमुख मृणालिनी वाघमारे यांनी केले. राष्ट्रीय वाचनालय महालच्या सांस्कृतिक कार्यकारिणीचे अध्यक्ष अनिल देव यांनी कार्यशाळेला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मृणालिनी वाघमारे, रंजना राणे, प्रज्ञा करकरे, प्रज्ञा देशपांडे, वृषाली पुणेकर आणि रेखा एकरे यांनी परिश्रम घेतले. येत्या ३० ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण कथा कथाकथन कार्यशाळा, तर ६ सप्टेंबर रोजी गणपती कथाकथन तसेच गणपती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या मुलांना या उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे, असे आवाहन राष्ट्रीय वाचनालय लक्ष्मीनगर केंद्र, मनःस्पर्ष हॉस्पिटल, तळमजला, लक्ष्मीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
सौजन्य: चंद्रशेखर शिरसागर, संपर्क मित्र