ब्रम्हपुरी,
farmer injured in tiger attack शेतात काम करीत असलेल्या शेतकर्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारी 3.45 वाजताच्या सुमारास कळमगाव येथे घडली. बुधा सितकुरा मांदाळे ( 55, रा. कळमगाव, ता. ब्रम्हपुरी) असे जखमी शेतकर्याचे नाव आहे. शेतकरी बुधा मांदाळे हे मंगळवारी दुपारच्या सुमारास उत्तर ब्रम्हपुरी परिक्षेत्रामधील कळमगाव नियतक्षेत्रातील गट क्रमांक 50 मधील शेतात काम करीत होते. यावेळी वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात ते जखमी झाले. जखमी शेतकर्याला वन परिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार यांनी ब्रम्हपुरी येथील जिल्हा उप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी शेतकर्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने कन्नमवार यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात वाघाची दहशत पसरूली असून, वनविभागाने तात्काळ दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.