सिंदी (रेल्वे),
heartless farmer लग्न आणि अन्त्यसंस्कार कुणाचेही थांबत नाही, असा समज रुढ आहे. पण, नजिकच्या हेलोडी येथील एका निष्ठूर शेतकर्याने गावातीलच एका अन्त्ययात्रेला स्मशानात नेऊ दिले नाही. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद मिटला. हेलोडी गावात पाच गावं मिळून गट ग्रामपंचायत आहे. पण, मागील ८० वर्षांत ग्रामपंचायतने गावाला हकाची स्मशानभूमी तयार केली नाही.

दोन दिवसांपूर्वी गावातील एका सामान्य कुटुंबातील व्यतीचे निधन झाले. गावकर्यांनी परंपरागत स्मशानभूमीत अन्त्ययात्रा नेत असताना नाल्याच्या बाजूलगत शेत असलेल्या शेतकर्याने ती अन्त्ययात्रा अडवली. अनेकांनी विनवण्या केल्या पण, त्या शेतकर्याला पाझर फुटला नाही. एक तासानंतर तिरडी न्या, पण बैलबंडी नेण्यास जागा देणार नाही, असा पवित्रा घेतला. दरम्यान, या घटनेची सूचना सिंदीच्या ठाणेदारास दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. उभयगटाशी चर्चा करुन हा वाद संपविला. शेवटी दोन तासांनी त्या प्रेताला मुखाग्नी देण्यात आली. शेतकर्याने ते वादग्रस्त शेत नव्यानेच विकत घेतले आहे. त्यामुळे तो मार्ग देत नव्हता. शेतमालाच्या नुकसानीचे काय? असा त्याचा सवाल होता. पण, ग्रामपंचायतने स्मशानभूमीसाठी अद्याप जागा नकी का केली नाही, हे कोडे या निमित्ताने चर्चेला आले