रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडकीला १,७५० रुपयांचा हप्ता

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
मुंबई
ladki bahin yojana राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन वाढवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत थेट जमा केली जाते. मात्र, यंदाच्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या नियमित रकमेत वाढ करून ती १,७५० रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याचे सांगितले जात आहे.
 

ladki bahin yojana rs 1,750 installment ahead of raksha bandhan, payment date awaited 
‘लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसाठी चालू महिन्यात विशेष आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच या महिन्याचा नियमित हप्ता मिळण्याची शक्यता असून, त्यासोबत रक्षाबंधनानिमित्त अतिरिक्त ओवाळणीही दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या २८ ऑगस्ट २०२६ रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून ३४४.७४ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना चालू महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रक्षाबंधनाच्या तोंडावर नियमित हप्त्यासोबत ओवाळणीची रक्कम मिळणार असल्याने राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, १,७५० रुपयांची रक्कम नेमकी कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या तारखेला खात्यावर जमा होणार, याबाबत शासनाकडून अधिकृत स्पष्टता येणे अद्याप बाकी आहे.