महिला प्रबोधन मंडळाचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
नागपूर,
mahila prabodhan mandal महिला प्रबोधन मंडळ, नागपूरचा १४ वा वर्धापन दिन २४ ऑगस्ट २०२६ रोजी माधवनगर सभागृह येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माइंड पार्क संस्थेच्या उर्मिला क्षीरसागर होत्या. मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई पाध्ये आणि सचिव उर्मिला राजदेरकर यांचीही मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभा गाडगीळ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय स्नेहल खंडागळे यांनी करून दिला, तर उषा देव यांनी स्वागत केले. आभार प्रदर्शन तेजश्री काटदरे यांनी केले.
 
mahila prabodhan mandal
 
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई पाध्ये यांनी वार्षिक अहवाल सादर केला. मंडळातील सदस्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळातील कलाकारांनी विविध कलांचे सादरीकरण करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. अभिव्यक्तीच्या अध्यक्षा स्वाती सुरंगळीकर, सुप्रसिद्ध कवयित्री सुचित्रा कातरकर, वनवासी कल्याण आश्रमाच्या अध्यक्षा शिप्रा पितळे यांच्यासह अनेक मान्यवर स्त्री-पुरुष उपस्थित होते.
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र