नेपाळमध्ये महापुराचा कहर...160 हून अधिक मृत्यू, 750 पेक्षा जास्त बेपत्ता

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
काठमांडू,
massive floods in Nepal नेपाळ आणि तिबेट सीमावर्ती भागात अचानक आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 160 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 750 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आपत्तीत 130 हून अधिक भारतीय नागरिकही बेपत्ता असून त्यापैकी अनेक जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते.महापुराच्या भीषणतेचे दृश्य दाखवणारा व्हिडिओही समोर आला आहे. त्यामध्ये काही लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसतात आणि काही क्षणांतच मलब्यासह आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे परिसर उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते. तिबेटमधून सुरू झालेल्या या पुराच्या प्रवाहाने नेपाळमधील अनेक गावे आणि शहरांना मोठा फटका बसला. अनेक महत्त्वाचे पूल वाहून गेले असून सुमारे डझनभर जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झाले आहे.
 
 

haroon 
 
नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनल यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, तिबेट परिसरात स्थानिक वेळेनुसार सकाळी 8:37 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत अचानक पूर आल्याची माहिती मिळाली. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे हिमनदी फुटली असावी आणि त्यातून महापुराची स्थिती निर्माण झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुराचे पाणी भोटे कोशी नदीतून आले आणि त्याचा फटका तिबेट सीमेलगतच्या रसुवा आणि धाडिंग जिल्ह्यांना बसला. नेशनल डिजास्टर रिस्क रिडक्शन एंड मैनेजमेंट अथॉरिटीने सांगितले की, नेपाळ-तिबेट सीमेवरील लहेंडे नदीत मोठ्या प्रमाणावर दरड आणि दगड घसरून नदीला पूर आला. त्यामुळे रसुवा जिल्ह्यातील सीमावर्ती तिमुरे शहरातून वाहणाऱ्या भोटे कोशी नदीचे पाणी त्रिशूली नदीत मोठ्या प्रमाणात मिसळले आणि पूरस्थिती अधिक गंभीर झाली.
 
 
नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेवर गेलेल्या अनेक भाविकांचा समावेश आहे. सम्राट टूर्स एंड ट्रैवल एजेंसीच्या माहितीनुसार, किमान 59 भारतीय कैलास मानसरोवर यात्रेतील तीर्थयात्री होते. या पार्श्वभूमीवर काठमांडूतील भारतीय दूतावासासह तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी प्रभावित भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन सुरू केल्या आहेत.नेपाळ पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या महापुरात 157 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. नेपाळ सरकारच्या माहितीनुसार सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. त्याचवेळी चीनच्या सरकारी CGTN न्यूज चॅनेलने सीमेपलीकडील चिनी भागात तीन जणांचा मृत्यू आणि 265 जण बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. चीनच्या सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार तिबेटमध्ये एकूण 558 जण बेपत्ता आहेत, तर नेपाळमध्येही शेकडो नागरिकांचा शोध सुरू आहे.
 
 
भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी चीनमधील भारतीय दूतावासानेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तिबेट-नेपाळ सीमेवरील भागात अडकलेल्या भारतीयांना स्थानिक चिनी अधिकाऱांशी 0086 139 8999 0012 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. बीजिंगमधील भारतीय दूतावासासाठी 0086 185 1428 4905 हा क्रमांक देण्यात आला आहे. तसेच काठमांडूतील भारतीय दूतावासाशी +977 985 131 6807 आणि+977 970 910 7500 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. या दोन्ही क्रमांकांवर WhatsApp सुविधाही उपलब्ध आहे.
 
गृहमंत्री अमित शाह यांनी नेपाळमधील आपत्तीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, या संकटाच्या काळात भारत सरकार नेपाळसोबत उभे आहे. तसेच बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली असून सीमावर्ती भागांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन, बचाव पथके आणि NDRF ला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.कर्नाटक सरकारनेही नेपाळ-तिबेट सीमा आणि तिबेट ऑटोनॉमस रीजनच्या आसपास अडकलेल्या राज्यातील नागरिकांसाठी स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचा 1070/080-22253707 हा संपर्क क्रमांक जारी केला आहे. नेपाळ आणि/किंवा TAR परिसरात अडकलेल्या कर्नाटकातील नागरिकांची माहिती सरकारकडून गोळा केली जात आहे.