एनसीसी छात्र सैनिकांनी सीमेवर पाठवल्या ३ हजार राख्या

एक राखी सैनिक के नाम

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
देवळी,
name of a rakhi soldier येथील एसएसएनजे महाविद्यालयातील छात्रसैनिक कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या नेतृत्वात प्रत्येक वेळी सामाजिक उपक्रमात आघाडीवर असतात. दरवर्षी सीमेवर लढणार्या सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम यावर्षीही राबवण्यात आला. यावर्षी तब्बल ३ हजार राख्या सीमेवर पाठवण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून २१ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार प्रमोद घोरपडे, हवालदार अश्विन सिंग, एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, प्रा. जगदीश यावले, प्रा. वंदना मुनेश्वर उपस्थित होते.
 
name of a rakhi soldier
 
सुभेदार प्रमोद घोरपडे म्हणाले की, राष्ट्रीय छात्र सेना युनिट, राष्ट्रीय सेवा योजना युनिट व रोव्हर रेंजर युनिट यांच्या संयुक्त वतीने सीमेवरील तैनात असलेल्या सैनिकांकरिता पाठविण्यात येत असलेल्या राख्या हा केवळ धागा नसून विश्वासाचे, प्रेमाचे आणि देशभक्तीचे नाते निर्माण करणारा सण असल्याचे प्रतिपादन सुभेदार प्रमोद घोरपडे यांनी केले. प्राचार्य सुनिता सोनारे यांनी रक्षाबंधन बंधुभाव, एकता व देशप्रेम निर्माण करणारा सण असल्याचे म्हणाल्या.
 
कॅप्टन गुजरकर यांनी राखी हे शांतता, मैत्री, प्रेम, एकता व स्नेहाचे प्रतीक आहे. प्राचीन भारतापासून आजपर्यंत राखीमुळे अनेक संबंध सुधारलेली आहेत व समाजात नैतिक मूल्यांची रुजवण होत असल्याचे सांगितले. याप्रसंगी सीनियर अंडर ऑफिसर कल्याणी लिखार, अंडर ऑफिसर वैष्णवी कन्नाके, सार्जंट स्नेहा मडकाम, सार्जंट दुर्गेश पोटे, सार्जंट यामिनी पारधी, आरती मरघडे, जानवी जोड, सोमेश्वर पोराटे व राधिका नागोसे यांनी रक्षाबंधन या विषयावर मनोगत व्यक्त केले. यशस्वीते करिता एनसीसी छात्र सैनिक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व रोव्हर्स रेंजर्सनी अथक प्रयत्न केले.