नितेश कराळे यांना अटक

समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
वर्धा,
nitesh karale शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे यांना अमरावती येथून स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलिसांनी आज, २७ रोजी अटक केली. समाजमाध्यमांवर ते कराळे मास्तर म्हणून प्रसिद्ध असून वर्धेत स्पर्धा परिक्षेचे क्लासेस चालवतात.
नितेश कराळे हे आपल्या वऱ्हाडी शैलीत व्हिडिओ तयार करून ते प्रसारित करत होता. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ताही आहेत. ३१ जुलै रोजी आरक्षण हटाव या विषयावर त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला होता. या व्हिडिओत त्यांनी आदिवासी समाजाविषयी कथित आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली होती. शहर पोलिस ठाण्यात तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये १९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी आणखी एका व्हिडिओमध्ये देशाच्या न्यायव्यवस्थेबाबतही कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समोर आले. या प्रकरणातही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 

nitesh karale, karale master, nitesh karale arrest, wardha, amravati, wardha news, maharashtra news, social media controversy, objectionable post, sc st act, police arrest, judicial custody, ncp sharad pawar, sharad pawar group, local crime branch, maharashtra politics, viral video, tribal community, court news 
दोन्ही प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर ते फरार होते. त्यांच्या शोधात स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे तीन पथक रवाना करण्यात आले होते. दरम्यान, रात्री १२.३० वाजता त्यांना अमरावती येथील तपोवन परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांचे पथक त्यांना घेऊन मध्यरात्री ३.३० वाजता वर्धेत पोहोचले. त्यानंतर एलसीबीने त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. वैद्यकीय तपासणीनंतर गुरुवारी सायंकाळी त्यांना वर्धा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.