बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Sahitya Vihar Sanstha साहित्य विहार संस्था व केशवनगर सांस्कृतिक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने केशवनगर माध्यमिक विद्यालयात दोन दिवसीय बालकुमार संवाद साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. मेघे ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका आभाताई मेघे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी डॉ. आशाताई पांडे होत्या.
 
678
 
 
बालकांनी नियमित वाचन करावे आणि पालकांनी मुलांना दर्जेदार साहित्याची गोडी लावावी, असे आवाहन आभाताई मेघे यांनी केले. संमेलनात स्वगत कथन, समयस्फूर्त भाषण, नाट्यवाचन, समूहगीत, कविता पाठांतर व बालकाव्यवाचन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी १५० विद्यार्थ्यांनी साहित्यिक व संतांच्या वेशभूषेत साहित्य दिंडी काढली.
सौजन्य: मंदा खंडारे ,संपर्क मित्र