पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात ‘लर्न अँड अर्न’ स्टॉल्स

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
नागपूर, (कामठी)
Seth Kesarimal Porwal College सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, घरगुती उत्पादने, खाद्यपदार्थ व विविध वस्तूंच्या विक्रीसाठी ‘लर्न अँड अर्न’ संकल्पनेअंतर्गत स्टॉल्सचे आयोजन करण्यात आले.डॉ. रेणू तिवारी व डॉ. रेणुका रॉय यांच्या हस्ते स्टॉल्सचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी डॉ. स्वप्निल दहाट होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. हुसेन, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य वंजारी, सुपरवायझर मेंढे तसेच प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
 

45 
 
विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या, हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ आदींचे स्टॉल्स उभारून आपल्या कल्पकतेचे व कौशल्याचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आत्मविश्वास व स्वावलंबनाची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. उपक्रमाचे आयोजन प्रा. पुडके व डॉ. हिना कौसर यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.
सौजन्य: प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, संपर्क मित्र