शिवसेनेच्या महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
नागपूर,
shiv senas womens शिवसेना नागपूर जिल्हाप्रमुख अनिता जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळावा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित राहिल्याने मेळाव्याला उत्साहाचे वातावरण होते. मेळाव्यात महिलांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी महिलांनी सक्रियपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश करणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.
 
shiv senas womens
 
कार्यक्रमाला नागपूर संपर्क नेते संजय निरुपम, माजी खासदार तथा विधान परिषद आमदार कृपाल तुमाने, किरण पांडव, सूरज गोजे, धीरज यादव, अजय दलाल, बंडू तळवेकर, मनीषा पापडकर, गायत्री वैद्य, सरोज वैष्णव, मीना जालेकर, शिल्पा थोटे आणि दिपाली बोकडे यांच्यासह महिला आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. महिला मेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महिलांना संघटनेत अधिकाधिक संधी देऊन त्यांचा सामाजिक आणि राजकीय सहभाग वाढविण्यावर भर दिला जाईल, असे शिवसेना महिला आघाडी नागपूर जिल्हाप्रमुख अनिता जाधव यांनी सांगितले.
सौजन्य: वीरेंद्र जोगी, संपर्क मित्र