नागपूर,
Sur Milan Group सूर मिलन ग्रुपतर्फे रूफ लाईट स्टुडिओ, जयताळा येथे प्रसिद्ध गायक किशोर कुमार आणि मुकेश माथुर यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ‘ये देश है वीर जवानों का’ या देशभक्तीपर गीताने, तर ‘चंचल, शीतल, निर्मल, कोमल’ या गीताने सांगता झाली.
व्हॉईस ऑफ मुकेश’ राजू व्यास आणि डॉ. भूषण महाजन हे अतिथी गायक म्हणून सहभागी झाले. कमलेश टहिल्यानी, मकरंद बक्षी, सचिन जहागिरदार, सुहास कुलकर्णी, अभय पांडे, मकरंद पांढरीपांडे, विनोद आठवले, सुधीर देशपांडे, दिलीप बमनोटे, श्रीकृष्ण मंडपे, ललित पांडे, दीपक कुलकर्णी, वर्षा देशमुख, भाग्यश्री जहागिरदार, वैशाली देशपांडे आणि संगीता बक्षी यांनी किशोर कुमार व मुकेश यांची सोलो व युगल गीते सादर करून रसिकांची दाद मिळविली.कार्यक्रमाचे आयोजन मकरंद बक्षी यांनी केले. सूत्रसंचालन संगीता बक्षी यांनी केले, तर आभार मकरंद बक्षी यांनी मानले. ध्वनी व चित्रफितीची जबाबदारी वेदांत खंडाळकर यांनी सांभाळली.
सौजन्य : कल्पना वाराणशीवार,संपर्क मित्र