अमाल मलिकचा फिल्म म्युझिकला ब्रेक!

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
मुंबई,
amaal mallik संगीतकार आणि गायक अमाल मलिकने 27 ऑगस्ट 2026 रोजी X वर पोस्ट करत फिल्म म्युझिकमधून ब्रेक घेण्याची घोषणा केली. आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी काही काळ विश्रांती घेणार असल्याचे त्याने सांगितले. नुकतेच त्याचे ‘ये आवारापन’ हे गाणे इमरान हाश्मीच्या ‘आवारापन 2’मध्ये झळकले होते.
 

amaal mallik
 
अमालने पुढील वर्षापर्यंत चित्रपटांसाठी नवीन गाणी कंपोज न करण्याचा निर्णय घेतला असून, 2027 मध्ये दमदार पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, त्याच्या जुन्या आणि अद्याप प्रदर्शित न झालेल्या काही चित्रपटांमधील गाणी भविष्यात रिलीज होऊ शकतात. अमालने चाहत्यांना साथ देण्याचे आवाहन करत सध्या आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचे स्पष्ट केले आहे.