नेपाळमधील विध्वंसाने अनुपम खेर हादरले

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
मुंबई,
anupam kher नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठी जीवितहानी झाली असून, या संकटावर अभिनेता अनुपम खेर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या माहितीनुसार, पुरात ३५९ जणांचा मृत्यू झाला असून २८८ भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर भावनिक संदेश देत पीडितांसाठी प्रार्थना केली.
 

anupam kher
 
अनुपम खेर यांनी नेपाळमधील पूरग्रस्त भागातील विध्वंसक दृश्यांवर प्रतिक्रिया देताना, “ही हानी पाहून मला असहाय्य वाटत आहे,” असे म्हटले. या आपत्तीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून घरे आणि मालमत्ता वाहून गेल्याचे त्यांनी नमूद केले. प्रिय व्यक्तींना गमावलेल्या कुटुंबांचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, खराज मुखर्जी आणि रजतभ दत्ता यांच्यासह काही कलाकारही या पुरात अडकले आहेत. नेपाळसोबतच सीमेपलीकडील तिबेटमध्ये प्रभावित झालेल्या नागरिकांसाठीही अनुपम खेर यांनी प्रार्थना केली. संकटात सापडलेल्यांपर्यंत तातडीने मदत पोहोचावी आणि जगाने या कठीण काळात एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन त्यांनी केले.