अमरावती
bjp rakhi amravati महाराष्ट्रातील देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींनी शुक्रवारी अमरावती येथे भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे व आ. प्रवीण पोटे पाटील यांच्या सह भाजपातील पदाधिकारी व कार्यकर्ता बंधूंना राखी बांधून उत्साहात रक्षा बंधन साजरे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशातील आणि महाराष्ट्रातील महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्याचप्रमाणे अमरावतीतील भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधू देखील आपल्या बहिणींच्या पाठीशी कणखरपणे उभे राहतील, असे आश्वासन यावेळी भाजपाच्या नेत्यांनी जमलेल्या शेकडो भगिनींना दिले. शहराच्या विविध भागातून आणि प्रामुख्याने झोपडपट्टीतील मागासवर्गीय भागातून आलेल्या महिलांनी एकच गर्दी करून भाजपाच्या नेत्यांना राखी बांधून आपले आपले रक्षाबंधन साजरे केले.
खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे यांच्यासह भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, नितीन गुडधे, चेतन पवार, दीपक पोहेकर यांच्यासह उपस्थित सर्व बंधूंना भगिनींनी राखी बांधली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व महिलांना साडी भेट म्हणून देण्यात आली. यावेळी शहराच्या विविध भागातून आलेल्या महिलांनी आपल्या भागातील समस्या, तक्रारी आणि काही विकासात्मक सूचना देखील आपल्या लाडक्या भावांना केल्या. भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम साजरा झाला.