भाजप महिला आघाडीतर्फे रक्षाबंधन उत्साहात

महिलांच्या पाठीशी कायम : तडस

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
देवळी
bjp-womens raksha-bandhan भारतीय जनता पार्टी देवळी महिला आघाडीच्या वतीने भाजपा कार्यालयात माजी खासदार तथा महाराष्ट्र राज्य भाजपा उपाध्यक्ष रामदास तडस, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी कारोटकर, महामंत्री कविश सुरकार व विजय चौधरी यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजि खासदार रामदास तडस यांनी भारतीय जनता पार्टी कायम महिलांच्या सक्षिमीकरणाच्या बाजूने असल्याचे म्हणाले.
 
wardha bjp
महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी देवळी पोलिस ठाण्यात ठाणेदार नितीन मदनकर तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचार्यांना राखी बांधली. समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणार्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष विद्या झिलपे, वर्षा बावनकुळे, वैशाली समर्थ, शुभांगी कुर्जेकर, माया वडेकार, ज्योती खाडे, मंगला मोकडे, छाया तडस, दीपाली पाहुणे, आदींसह भाजपा महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.