वर्धा,
dr bhoyar जिल्हा नियोजन समितीतून मंजूर विविध ग्रामीण रस्ते, तीर्थक्षेत्र, यात्रास्थळांची कामे विहित कालावधीत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी. यासाठी बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण, ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण आणि क वर्ग तीर्थक्षेत्र व यात्रास्थळ विकास कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, अतिरित मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, सुनील गफाट, बांधकाम विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते. विविध बांधकामे हाती घेताना लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या कामांना प्राधान्य देऊन अशा कामांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा. बांधकामे सुरू असताना अधिकार्यांनी कामांची पाहणी करुन गुणवत्ता चांगली असल्याची खात्री करावी. शाळा, अंगणवाडीच्या कामांमध्ये प्रथम वॉटर रुफींग व कलरींगच्या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सुचनाही यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केल्या.
सन २०२५-२६ मध्ये इतर जिल्हा मार्ग रस्ते विकास व मजबुतीकरणाची ५८ कामे हाती घेण्यात आली असून ३० कामे पूर्ण झाली आहे. तर ९ कामे प्रगतीपथावर असून १७ कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. दोन कामांचा करारनामा करण्यात आला आहे. ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत ११९ कामे हाती घेण्यात आली असून ३१ कामे पूर्ण झालेली आहे. यापैकी ४९ कामे प्रगतीपथावर असून २९ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला.dr bhoyar तर ९ कामांचा करारनामा करण्यात आला असून १ काम निविदा स्तरावर आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत क वर्ग तीर्थक्षेत्र, यात्रास्थळ विकास कार्यक्रमांतर्गत ३७ कामे हाती घेण्यात आली असून २ कामे पूर्ण झालेली आहे. यातील १२ कामे प्रगतीत असून ११ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहेत तर ११ कामांचा करार करण्यात आला आहे. एक काम निविदा स्तरावर असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.