वर्धा,
fire department अमरावती येथील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर वर्धा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा रुग्णालय आणि सर्व शासकीय कार्यालयांमधील अग्निसुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. तसेच अग्निशमन दलानेही कारवाईला सुरुवात केली आहे. गत काही दिवसात अग्निशमन दलाने वर्धा नगर परिषद क्षेत्रातील ४३ खाजगी कोचिंग क्लासेससह ८ शाळा आणि ६ हॉटेल्सना अग्निशमन व्यवस्थेबाबत सूचना केल्या आहेत.
वर्धा जिल्हा रुग्णालयात यापूर्वी दोनदा आगीच्या घटना घडल्या असून त्यात शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या घटना घडूनही जिल्हा रुग्णालय प्रशासन अग्निसुरक्षा उपाययोजनांची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात गंभीर नसल्याचे उघड झाले. त्यामुळेच अग्निशमन दलाने अद्याप जिल्हा रुगणालयाला आगीचे ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयांमध्येही अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्र अग्निशमन आणि जीवनरक्षक उपायोजना अधिनियम, २००६ आणि संबंधित नियमांनुसार, सर्व शासकीय कार्यालयीन इमारती, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि मोठ्या खाजगी इमारतींमध्ये अग्निसुरक्षा प्रणाली अनिवार्य आहे.fire department असे असतानाही अग्निशमन विभागाच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, जिह्यातील अनेक इमारतींमध्ये आग प्रतिबंधासाठी आवश्यक अग्निसुरक्षा उपरकणे आणि उपायोजनांचा अभाव आहे.
वर्धा नगर परिषद क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय आणि खाजगी इमारतींमध्ये अग्निसुरक्षा प्रणालीच्या अंमलबावणीबाबत आवश्यक सूचना केल्या जात आहेत. अग्निशमन विभागाने वर्धा पंचायत समितीलाही नोटीस बजावली आहे. ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व इमारतींमध्ये अग्निसुरक्षा प्रणाली योग्यरित्या कार्यरत आहे की, नाही याची चौकशी करण्यासाठी पत्र पाठविण्यात आलेली आहेत.