नागपूर
hearing-impaired-swimmer-saves-girl शहरातील शार्क अॅक्वाटिक्स स्पोर्टिंग असोसिएशनचा सदस्य असलेला कर्णबधिर जलतरणपटू अक्षय रवींद्र नवले याने अंबाझरीत आत्महत्यासाठी गेलेल्या एका मुलीचा जीव वाचविला. तो प्रसिद्ध जलतरण प्रशिक्षक संजय बाटवे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.
बाटवे आणि अक्षय तलावात अनेक तरुण जलतरणपटूंना प्रशिक्षण देत असताना, त्यांना एक मुलगी आत्महत्येच्या प्रयत्नात तलावात उडी मारत असल्याची माहिती मिळाली. बाटवे यांनी तात्काळ अक्षयला सुमारे १५० मीटर अंतरावर असलेल्या त्या मुलीपर्यंत पोहोचण्याचा संकेत केला. अक्षयने तात्काळ (सांकेतिक) कृती करत घटनास्थळी पोहोचून त्या मुलीला बुडण्यापासून वाचवले. दुसरा जलतरणपटू, इशान पांडे, फिल्टर प्लांटजवळील जागेकडे धावत गेला आणि नंतर अंबाझरीच्या पाण्यात उतरला. त्यानंतर अक्षय आणि इशानने त्या मुलीला पाण्याबाहेर काढण्यात यश मिळाले.
मुलीच्या पालकांनी अक्षयला पैसे देऊ केले, पण त्याने जीव वाचवणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत नम्रपणे नकार दिला. तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने त्याच्या प्रयत्नांची आणि मानवतेप्रती असलेल्या कर्तव्यनिष्ठेची प्रशंसा केली. अक्षय संगणक कोर्स करीत असून तो एनआयटी व रघुजीनगरातील कामगार भवन येथे जलतरणचे प्रशिक्षण देतो.
बाटवे म्हणाले की, याचे श्रेय नागपूर महानगर पालिकेला दिले आहे. कारण नुकताच तलावाचा बहुतांश भाग जलपर्णीपासून मनपाने स्वच्छ केला होता. ङ्कजर ती पाणवनस्पती तिथेच असती, तर त्या मुलीचा जीव वाचवता आला नसता,ङ्ख असे जलतरण प्रशिक्षक संजय बाटवे यावेळी म्हणाले.