अनिल कांबळे
नागपूर,
instagram friend इन्स्टाग्रामवरून झालेल्या मैत्रीनंतर युवकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ती सात महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सुभाष गोदेश्वर असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीची आरोपी सुभाषशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये मैत्री वाढली आणि त्याचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. आरोपीने २६ जानेवारी २०२६ रोजी मुलीला दिघोरी चौक, उमरेड रोड परिसरात भेटण्यासाठी बोलावले. तेथून तो तिला ओला टॅक्सीने एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. हॉटेलमध्ये त्याने मुलीला लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपीकडून लग्न करण्याबाबत टाळाटाळ सुरू झाली. मुलीने त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला असता तो विविध कारणे सांगून वेळ मारून नेत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, मुलीला आपण सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.instagram friend त्यानंतर तिने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आणि मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडिता घटना घडली त्यावेळी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) आणि ६९ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा नोंदविला.
पालकांनो सावधान...
गुन्हा दाखल झाल्यानंतर वाठोडा पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून त्याच्या संभाव्य ठिकाणांची माहिती घेतली जात आहे. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया माध्यमातून अल्पवयीन मुलींशी ओळख वाढवून त्यांचा गैरफायदा घेतला जात असल्याने पालकांनी मुलांच्या ऑनलाइन व्यवहारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.