एसएनसीयूमध्ये एकच व्हेंटिलेटर

जिल्हा रुग्णालयातील प्रकार

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
वर्धा,
sncu hospital गरजू व गरिबांसाठी उपयुक्त ठरणार्‍या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनसीयूत नवजात बालकांवर तज्ज्ञ डॉटरांच्या मार्गदर्शनात उपचार केले जातात. अमरावती येथील घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील या एसएनसीयूतील आरोग्य सेवेची माहिती जाणून घेतली असता तेथे केवळ एकच व्हेंटिलेटर असल्याचे सांगण्यात आले. तर मनुष्यबळाची कमतरता असल्याने बहुदा गंभीर नवजात बालकांना सेवाग्राम व सावंगी मेघे वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले जात आहे.
 

sncu hospital 
 
 
जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, आठ ग्रामीण रुग्णालय व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या शासकीय आरोग्य संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय आरोग्यसेवेचा लाभ दिला जात आहे, पण या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये अनेक तज्ज्ञ डॉटरांची पदे रित आहे. त्यामुळे बहुदा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्यांनाही खाजगी रूग्णालयात उपचारासाठी जावे लागते. अमरावती येथील स्त्री रुग्णालयात सोमवारी शिल्लर कंपनीच्या व्हेंटिलेरचा स्फोट होत ३ नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आली आहे. याच पाश्वर्र्भूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील आरोग्य सेवा व सुविधांची माहिती जाणून घेतली असता या विभागात केवळ विस्टा कंपनीचे एकच व्हेंटिलेटर कार्यरत असल्याचे सांगण्यात आले, पण संबंधित व्हेंटिलेटर हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ याठिकाणी नसल्याने या व्हेंटिलेटरचा पाहिजे तसा वापर होत नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय तेथील गंभीर नवजात बालकांना सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर आउट केले जात आहे.sncu hospital नव्याने रुजू झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंग पवार हे स्वतः बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळे या विभागाला आणखी सक्षम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करावे, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.
शासकीय रुग्णालयात शिल्लरचे व्हेंटिलेटर नाही
जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ५० व्हेंटिलेटर असून त्यापैकी निम्मे अडगळीत तर काही सुस्थितीत व वापरात असल्याचे आरोग्य यंत्रणेतील खात्रिदायक सूत्रांकडून कळले आहे. या व्हेंटिलेटरमध्ये शिल्लर कंपनीच्या व्हेंटिलेटरचा समावेश नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.