प्रज्ञानंदने घडविला इतिहास

‘ग्रॅण्ड चेस टूर’चे विजेतेपद पटकावले

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |

 

सेंट लुईस

praggnanandhaa येथे भारतीय ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदने 'ग्रॅण्ड चेस टूर'चे विजेतेपद पटकावून इतिहास घडविला. 'ग्रॅण्ड चेस टूर फायनल्स'मध्ये प्रज्ञानंदने फॅबियानो कारुआना विरुद्ध शानदार पुनरागमन करीत हे प्रतिष्ठित विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळविला. त्याने २ लाख डॉलर्सचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

pradyannand 

दिवसाची सुरुवात करताना हा भारतीय ग्रॅण्डमास्टर कारुआनापेक्षा सहा गुणांनी मागे होता. मात्र, त्याने वेगाने सामन्याचे चित्र पालटले आणि दोन्ही 'रॅपिड' गेम्स जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर 'ब्लिट्झ' प्रकारात कारुआनाशी बरोबरी राखत त्याने १५-१३ अशा अंतिम गुणांसह विजेतेपद निश्चित केले.

 

प्रज्ञानंदची पुनरागमनाची रणनीती

पहिल्या 'ब्लिट्झ' गेममध्ये प्रज्ञानंदकडे जिंकण्याची संधी होती, परंतु वेळेच्या दबावाखाली त्याच्याकडून चूक झाली. त्याची स्थिती वेगाने खालावली, पण कारुआनाला त्याचा फायदा घेता आला नाही व अखेरीस तो सामना बरोबरीत सुटला.
 

ग्रँडमास्टर वेस्ली सो यानेही ग्रँडमास्टर व्हिन्सेंट कीमर विरुद्धच्या तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात पुनरागमन केले. 'रॅपिड' प्रकारात दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक विजय मिळविला, परंतु 'ब्लिट्झ' प्रकारात 'सो'चे वर्चस्व राहिले. त्याने चारही गेम्स जिंकत, एक गेम शिल्लक असतानाच सामना आपल्या नावे केला. त्याने १८-१२ अशा फरकाने विजय मिळविला.