अनिल कांबळे
नागपूर,
young women from delhi यशोधरानगर पोलिसांनी संगम नगर परिसरातील देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा टाकून तीन तरुणींना ताब्यात घेतले. येथे तरुणींना दिल्ली, नागपूरसह अन्य ठिकाणांहून पैशांचे आमिष दाखवून आणण्यात येत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईत देहव्यापारासाठी घर उपलब्ध करून देत असल्याच्या आरोपावरून प्रविण शालीकराम बिलसे (यादव), वय ३०, रा. पवननगर, यशोधरानगर, नागपूर याला अटक करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत १ लाख १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.३५ वाजता संगम नगरातील संजीवनी क्वार्टर क्रमांक ३४/१, वनदेवी चौक, हॉटेल अल रहमानसमोरील गल्लीत ही कारवाई करण्यात आली. संबंधित ठिकाणी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. खात्री झाल्यानंतर पंच व पोलिस पथकाने घरावर छापा टाकला. त्यावेळी आरोपी स्वतःच्या घरात तीन तरुणींकडून देहव्यापार करून घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तिन्ही पीडित तरुणींची पोलिसांनी सुटका केली.
कारवाईदरम्यान पंटरने दिलेले २ हजार रुपये, आरोपीच्या ताब्यातील ६ हजार ७५० रुपये रोख, मोपेड, मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.young women from delhi याप्रकरणी यशोधरानगर पोलिस ठाण्यात विविध कलमखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहायक पोलिस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई पोलिस हवालदार रितेश दुधे, मंगेश गिरी, वर्षा नोनारे, बबीता नन्नावरे यांनी केली.
........
दिल्लीतील तरुणींना कमी दिवसांत जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून नागपुरात आणण्यात आले होते. त्या तरुणीला एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तरुणीला काही महिन्यांसाठी केलेल्या करारावर देहव्यापारासाठी आणले होते. त्यामुळे आंबटशौकीन ग्राहकांची या ठिकाणी होत होती.