गडचिरोली,
satya-pujan नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम व रामानंद संप्रदाय, चामोर्शीच्या वतीने सत्य नरेंद्र पूजनाचा कार्यक्रम श्रीक्षेत्र मार्कंडादेव येथील श्री गोविंद स्वामी महाराज मठाच्या सभागृहात सोमवार, 24 ऑगस्ट रोजी भक्तिमय वातावरणात पार पडला.
या पूजनासाठी मंगेश वासेकर व त्यांच्या पत्नी पल्लवी मंगेश वासेकर यांना मुख्य यजमानपदाचा मान मिळाला. तर 43 जोडप्यांनी पूजनात सहभाग घेतला. पुरोहित सौरभ भांडेकर गुरुजी यांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला जिल्हा सल्लागार रामभाऊ सातपुते, जिल्हा सचिव प्रकाश कुनघाडकर, तालुका अध्यक्ष लोमेश भांडेकर, तालुका महिलाध्यक्ष सुरेखा बुरांडे, गुणाजी कुनघाडकर, वर्षा दुधबळे, राजू लटारे उपस्थित होते.
पूजन सोहळ्यानंतर उपस्थित गुरुबंधू-गुरुभगिनी व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चामोर्शी, तळोधी, काशीपूर, उमरेड, नवेगाव, माल्लेर चक, माल्लेर मा., वाकडी, निमडरटोला आणि जामगिरी येथील संप्रदायाच्या नागरिकांनी परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सोहळ्यात पुरुषोत्तम भांडेकर, अशोक भांडेकर, रमेश नैताम, धनराज वासेकर, दिलीप कोठारे, राकेश वाघाडे, मोरेश्वर चलाख, ढिवरू चलाख, गुरुदास गुरनुले, जगदीश भांडेकर, अशोक वासेकर, सुनील दुधबळे, चरणदास कोठारे, गीता सातपुते, साधना भांडेकर, सुनील बारसागडे, मनीष दुधबळे यांनी सहभाग घेतला.