रक्षाबंधनाला सुशांतसाठी बहिणीची भावुक पोस्ट

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
मुंबई,
sisters emotional post for sushant रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्ती हिने भावाच्या आठवणींना उजाळा दिला. बालपणीचे फोटो शेअर करत तिने सुशांतसोबतच्या भावंडांच्या नात्यातील अनेक खास क्षण आठवले. तिच्या भावनिक पोस्टमधून लहानपणीच्या आठवणींसोबतच भाऊ-बहिणीमधील जिव्हाळाही प्रकर्षाने जाणवला.
 
sisters emotional post for sushant
 
श्वेताने सांगितले की, लहानपणी तिची आवडती खेळणी सुशांतसोबत शेअर करण्यात तिला विशेष आनंद मिळायचा. तिची एकुलती एक बाहुली असो किंवा भेट म्हणून मिळालेला छोटा किचन सेट, सुशांत त्या खेळण्यांमध्ये रमून खेळताना पाहणे तिला अधिक आनंद देत असे. मात्र, मिठाईच्या बाबतीत दोघांमध्ये थोडी वेगळीच गोष्ट होती. दोघांनाही मिठाई आवडत असल्याने त्याचे समान वाटप व्हावे, याकडे श्वेता विशेष लक्ष द्यायची. श्वेताच्या या पोस्टमधून सुशांतसोबतच्या तिच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा एकदा समोर आल्या. रक्षाबंधनाच्या निमित्ताने शेअर केलेल्या या जुन्या क्षणांनी चाहत्यांचेही लक्ष वेधून घेतले.