दोघांचा बळी घेणारी वाघिण अखेर जेरबंद

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर
tigress captured नागभीड एफडीसीएमच्या कक्ष क्रमांक 109 मध्ये दोघांचा बळी घेणार्‍या टी-61 सीएएफ वाघिणीस जेरबंद करण्यात वनविभागास अखेर शुक्रवार, 28 ऑगस्ट रोजी यश आले.
 
tigeress
एफडीसीएम कक्ष क्रमांक 109 मध्ये 19 मे 2026 रोजी वनिता शंकर उईके (रा. फिटाळी मेंढा) व 4 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास रमेश जयराम काशिवार (54, रा. जनकापूर) हे गट क्रमांक 168 मधील स्वतःचा शेतात काम करीत असताना त्यांना टी-61 एसएएफ वाघिणीने हल्ला करून ठार केल होते. ही वाघिण परिसरातील ही शेतशिवारात व गावशेजारी फिरत अल्यामुळे गावामध्ये व शेतीवर जाणार्‍या शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
 
यापूर्वीसुध्दा या वाघिणीकडून मानव व पाळीव प्राण्यांना ठार केल्याल्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे गावकर्‍यांमध्ये वनविभागाप्रती रोष निर्माण झाला होता. यापुढे मानव-वन्यजीव संघर्षाच्या अनुचित घटना घडू नये याकरिता या वाघिणीस जेरबंद करणे आवश्यक झाले होते. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी या परिक्षेत्रातील उपक्षेत्र मिंडाळा नियतक्षेत्र मिंडाळा मधील कक्ष क्रमांक 87 पी मध्ये पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डॉर्ट करून दिला. त्यानंतर शुटर अजय मराठे यांनी वाघिणीला डॉर्ट मारून बेशुध्द केले.
 
ही कार्यवाही ब्रम्हपुरी वनविभागाचे उप वनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर. यांच मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक (प्रादे. व वन्यजीव) अरविंद जे., तसेच नागभीड वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) भारती बगमारे, वन्यजीव तज्ज्ञ राकेश आहुजा, मिंडाळाचे क्षेत्र सहायक एम. पी. तावाडे, डॉ रवीकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.