राज्यातील आठ वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या बदल्या

विवेक खांडेकर यांच्यासह तिघांची नागपुरात बदली

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
forest officers महाराष्ट्रातील भारतीय वन सेवेतील (आयएफएस) आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने आणि बदलीने पदस्थापना करण्याचे आदेश राज्याच्या महसूल व वन विभागाने गुरुवारी(२७ ऑगस्ट) रोजी जारी केले. या फेरबदलात विवेक खांडेकर यांच्यासह तीन वन अधिकाऱ्यांची नागपुरात नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे वन विभागात मोठे फेरबदल झाले आहेत.
 

forest officers 
 
 
शासन आदेशानुसार, विवेक खांडेकर (१९९५) यांची पुणे येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) पदावरून प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती, तंत्रज्ञान व धोरण), नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. तर टी. ब्युला एलील मती (२०१२) यांची वनसंरक्षक पदावरून मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन), महाराष्ट्र वन विकास महामंडळ (एफडीसीएम), नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अग्रिम सैनी (२०१९) यांची उपवनसंरक्षक पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, गोरेवाडा प्राणि संग्राहालय, नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये तीन वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. दरम्यान, अमलेंदू पाठक (२०१३) यांची उपवनसंरक्षक (कार्य आयोजना), यवतमाळ येथे, तर कुशाग्र पाठक (२०१६) यांची प्रादेशिक व्यवस्थापक, (एफडीसीएम), नाशिक येथे पदस्थापना करण्यात आली आहे. डॉ. बी. एन. स्वामी (२०१९) यांची उपवनसंरक्षक (प्रादेशिक), पांढरकवडा येथे, धनंजय वायभासे (२०१९) यांची उपवनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), नाशिक येथे, तर यशवंत श्रीरामजी बहाळे (२०१९) यांची उपवनसंरक्षक (वन्यजीव), मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदरा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. शासन आदेशानुसार काही पदे प्रशासकीय कारणास्तव समकक्ष संवर्गाबाह्य पदे म्हणून घोषित करून संबंधित अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्यात आली आहे.forest officers तसेच बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या निर्देशानुसार आपला कार्यभार संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या बदल्यांमुळे नागपूरसह राज्यातील वन विभागाच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाचे बदल झाले असून, नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर संबंधित विभागांच्या कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.