अल्पसंख्याक समाजातील महिलांनी पालकमंत्री डॉ. भोयर यांना बांधली राखी

पहिल्यांदाच घेतला रक्षाबंधनाचा अनुभव

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
वर्धा
pankaj bhoyar raksha-bandhan अल्पसंख्याक समाजातील महिलांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हातावर राखी बांधत सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. विशेष म्हणजे, या महिलांनी आपल्या आयुष्यात प्रथमच एखाद्या व्यक्तीच्या हातावर राखी बांधली. नाजिया धामिया यांच्या पुढाकारातून अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

pankaj bhoyar 
 
यावेळी अल्पसंख्याक समाजातील महिलांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे औक्षण करून त्यांच्या हातावर राखी बांधली. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या पत्नी अॅड. शितल भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध धर्मांच्या लोकांमध्ये असलेले प्रेम आणि सामाजिक एकात्मता अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. पहिल्यांदाच राखी बांधताना महिलांच्या चेहर्यावर आनंद आणि भावनिक समाधान दिसून आले. समाजात विविधतेतून एकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. एका राखीच्या धाग्याने धर्माच्या सीमा ओलांडत बंधुभावाचे नाते जोडण्याचा प्रयत्न झाल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.