नवी दिल्ली
australia-a-womens-tour बीसीसीआयच्या महिला निवड समितीने ऑस्ट्रेलिया अ संघाच्या आगामी भारत दौऱ्यासाठी संघांची घोषणा केली आहे. अनुष्का शर्मा तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करेल, तर यास्तिका भाटिया एकदिवसीय व चार दिवसीय सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व करेल. टी-२० मालिकेत सायली सतघरे अनुष्काची उपकर्णधार असेल, तर वन-डे व बहु-दिवसीय अशा दोन्ही प्रकारांत अनुष्का ही भाटियाची उपकर्णधार म्हणून काम पाहिल.
एकदिवसीय सामन्यांसाठी भारत अ संघ: यस्तिका भाटिया (कर्णधार/यष्टीरक्षक), अनुष्का शर्मा (उपकर्णधार), वृंदा दिनेश, प्रिया पुनिया, तनिषा सिंग, तेजल हसबनीस, निक्की प्रसाद, उमा चेत्री (यष्टीरक्षक), मिनू मणी, अमनदीप कौर, वैष्णवी शर्मा, सायली सतघरे, जिंतीमणी कलिता, शबनम शकील, अक्षिता भगत.
चार-दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ: यस्तिका भाटिया (कर्णधार, यष्टीरक्षक), अनुष्का शर्मा (उपकर्णधार), शुभा सतीश, प्रिया पुनिया, तनिषा सिंग, तेजल हसबनीस, निक्की प्रसाद, ममता माडीवाला (यष्टीरक्षक), सुश्री दिब्यदर्शिनी, शुची उपाध्याय, वैष्णवी शर्मा, वैष्णवी शर्मा, शुचि उपाध्याय, शानमणी शर्मा शकील, अक्षिता भगत.ऑस्ट्रेलिया महिला अ संघाचा भारत दौरा: पहिला टी-२० सामना १२ सप्टेंबर, दुसरा टी-२० सामना १५ सप्टेंबर, तिसरा टी-२० सामना १७ सप्टेंबर रोजी न्यू चंदीगड येथे सामने होणार आहेत.
पहिला वन-डे सामना २० सप्टेंबर, दुसरा वन-डे २३ सप्टेंबर, तिसरा वन-डे २५ सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. चार दिवसीय सामना २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान धर्मशाळा येथे होणार आहे.