नागपूर,
Baljagat Laxminagar दीनदयाल शोध संस्थान, बालजगत लक्ष्मीनगर येथे ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ६ ते १६ वर्षे वयोगटासाठी शुल्क ३०० रुपये, तर १६ वर्षांवरील सहभागींसाठी ५०० रुपये शुल्क आहे.
नैसर्गिक मातीपासून स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती साकारण्याचा अनुभव या कार्यशाळेत घेता येणार आहे. मुलांसह कुटुंबीयांनी सहभागी होऊन भक्ती, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य :निकिता लुटेसंपर्क मित्र