कर्मचाऱ्यांना बांधले रक्षासूत्र

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
नागपूर ,
Deendayalnagar Samutkarsh Sanstha दीनदयालनगर समुत्कर्ष संस्था संचालित श्रीपांडुरंगेश्वर शिवमंदिर आणि दीनदयालनगर प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनानिमित्त महापालिकेतील महिला-पुरुष कर्मचारी तसेच विविध बांधकाम संकुलांतील कामगारांना रक्षासूत्र बांधण्यात आले.

talk 
 
 
कार्यवाह अजय तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ स्वयंसेवकांसह संस्थेचे पदाधिकारी व सभासद सहभागी झाले. यावेळी ‘आओ मनाये रक्षाबंधन’ हे सांघिक गीत सादर करण्यात आले. रक्षासूत्र बांधल्यानंतर भेटवस्तू व चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य:विकास देशपांडे,संपर्क मित्र