पिस्तूल दाखवून ५० हजारांची खंडणीची मागणी

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
extortion at gunpoint नागपूर मध्यवर्ती कारागृहात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका सराईत गुन्हेगाराने वाहनचालकाला पिस्तूल दाखवून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. ही घटना कपिलनगर परिसरात उघडकीस आली आहे. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देतानाच आरोपीने चालकाला गोळ्या घालण्याची भीती दाखविल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

extortion at gunpoint 
 
 
वंश विनोद यादव (२२, रा. काशीनगर, नारी रोड) असे तक्रारदार चालकाचे नाव आहे. त्याची कारागृहात असताना आरिफ बंगाली (२७) याच्याशी ओळख झाली होती. दोघांनाही एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल असलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. सुटका झाल्यानंतर दोघांची एकदा भेट झाली आणि त्यानंतर ते आपापल्या मार्गाने गेले. मात्र, पोलिसांना संशय आहे की, दोघांनी यापूर्वी एखादा गुन्हाही एकत्र केला असण्याची शक्यता आहे. २४ ते २६ ऑगस्टदरम्यान आरिफने वंश यादवशी फोन तसेच व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधण्यास सुरुवात केली. ईद जवळ येत असल्याचे सांगत त्याने यादवकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, यादवने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरिफने त्याला शिवीगाळ करून पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर आरोपीने यादवला गोळ्या घालण्याची धमकीही दिली. त्यामुळे घाबरलेल्या यादवने सुरक्षेच्या भीतीने थेट कपिलनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
यादवच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी खंडणी, जाणूनबुजून अपमान करणे आणि गुन्हेगारी धमकी यासंदर्भातील आरिफविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी कळमना पोलिसांना माहिती दिली. कळमना पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरिफला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरिफ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.extortion at gunpoint यामध्ये कळमना पोलिस ठाण्यासह अन्य ठिकाणी घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याला प्रतिबंधात्मक कारवाई करीत ताब्यात घेण्यात आले होते.