संविधान सशक्त समाजाचा पाया : अ‍ॅड. मेकाले

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Janhit Yuva Foundation भारतीय संविधान हे सशक्त, समताधिष्ठित व लोकशाही समाजाचा पाया आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेतून नागरिकांना समानता, अधिकार व मानवी मूल्यांची जाणीव होते, असे प्रतिपादन संविधान अभ्यासक अ‍ॅड. सचिन मेकाले यांनी केले.

tak 
 
जनहित युवा फाऊंडेशन व तथागत फाऊंडेशनतर्फे काशीनगर येथील तथागत अभ्यासिकेत ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अ‍ॅड. मेकाले यांनी संविधानाचे महत्त्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमास प्रशांत मुंद्रे, प्रा. सुधाकर स्थूल, रंजना सुरजुसे उपस्थित होते.
सौजन्य:शिवशंकर ताकतोडे ,संपर्क मित्र