नागपूर,(नरखेड)
Prohibition देवग्राम येथे झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा मुद्दा मांडण्यात आला. दारूच्या व्यसनामुळे युवक व कुटुंबांवर होणारे परिणाम लक्षात घेता गावात दारूमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेतला. भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा ग्रामीण महामंत्री प्रविण लोहे यांनी हा मुद्दा मांडला.
दरम्यान, गावातील विविध विकासकामांसाठी सुमारे ४ कोटी १ लाख ७२ हजार रुपयांचा निधीमंजूर झाला आहे. यात रस्ते, गटारे, समाजमंदिर, सार्वजनिक शौचालय व गुरांसाठी हौद आदी कामांचा समावेश आहे. विकासासोबतच दारूमुक्त देवग्रामचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.
सौजन्य:महादेव तायवाडे,संपर्क मित्र