नागपूर
Rameshwari-Shatabdi Chowk रामेश्वरी ते शताब्दी चौक मार्गावरील मार्ग क्रमांक ३ चा दिशादर्शक फलक इलेक्ट्रिक खांब व डीपीवर पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मार्ग शोधताना अडचणी येत असून, सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप दुरुस्ती झालेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून फलक योग्य ठिकाणी बसवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सौजन्य : अशोक माटे,संपर्क मित्र